फलटण: आपल्या फलटण शहराची लाडकी आणि लोकप्रिय वेबसाईट तसेच इंस्टाग्राम पेज @phaltandiaryindia (Phaltandiary.com) नेहमीच फलटणकरांसाठी वेगवेगळ्या माध्यमातून काहीतरी नवीन आणि रंजक घेऊन येत असते. सध्या फलटण शहरात 'फाल्टनडायरी'च्या वतीने खेळवल्या जाणाऱ्या अनोख्या 'ओटीपी शोधा आणि गिफ्ट जिंका' (OTP Hunting या गेमची प्रचंड चर्चा सुरू आहे.
नेमका गेम काय आहे?
'Phaltandiary' टीम शहरातल्या कोणत्याही एका ठिकाणी एका कागदाच्या तुकड्यावर 'ओटीपी' (OTP) लिहून तो लपवते. तो लपवतानाचा हिंट देणारा व्हिडिओ इंस्टाग्रामवर अपलोड केला जातो. जो फॉलोवर ती जागा शोधून तो ओटीपी सगळ्यात आधी मिळवतो, तो ठरतो त्या व्हिडिओमधील आकर्षक गिफ्टचा विजेता!
₹३०,००० च्या महा-गिफ्टचे सत्य काय?
नुकतेच 'Phaltandiary'ने ₹३०,००० किमतीच्या एका भव्य गिफ्टचा व्हिडिओ शेअर केला होता. त्यासाठी एक छोटीशी अट होती की, पेजचे ५०,००० फॉलोअर्स पूर्ण झाल्यावर हे गिफ्ट दिले जाईल. व्हिडिओ पाहून एका फॉलोवरने ती जागा शोधली आणि त्यांना तो ओटीपी मिळाला सुद्धा! मात्र, काही गैरसमजामुळे आणि अविश्वासामुळे त्यांनी ते गिफ्ट घेण्यास नकार दिला.
'Phaltandiary'चा फलटणकरांना शब्द:
"यापूर्वी सुद्धा आम्ही आमच्या एका भाग्यवान फॉलोवरला ₹१०,००० किमतीचे ब्रँडेड घड्याळ पूर्णपणे मोफत दिले आहे, ज्याचा व्हिडिओ पेजवर उपलब्ध आहे. आमचा उद्देश केवळ फलटणकरांचे मनोरंजन करणे आणि त्यांना आनंद देणे हाच आहे."
नकार मिळाला तरी गिफ्ट वाटप थांबणार नाही!
त्या फॉलोवरने गिफ्ट नाकारले असले, तरी Phaltandiary.com आपल्या शब्दाला पक्के आहे! ते ₹३०,००० चे गिफ्ट रद्द न करता, आता इतर काही भाग्यवान फॉलोअर्सना दिले जाणार आहे. हे गिफ्ट आता कोणाला आणि कसे मिळणार? याची संपूर्ण माहिती देणारा एक विशेष व्हिडिओ @phaltandiaryindia या इंस्टाग्राम पेजवर अपलोड करण्यात आला आहे.
एकही रुपया न खर्च करता जिंका मोठी बक्षिसे!
Phaltandiary टीमने फलटणकरांना आवाहन केले आहे की, या उपक्रमात सहभागी होण्यासाठी तुम्हाला कोणतेही चार्जेस किंवा पैसे द्यावे लागत नाहीत. कोणत्याही कष्टाशिवाय, केवळ थोडेसे चातुर्य आणि सोशल मीडियाचा वापर करून तुम्ही ही महागडी गिफ्ट्स जिंकू शकता.
तर मग वाट कसली पाहताय? आजच इंस्टाग्रामवर @phaltandiaryindia ला फॉलो करा, लेटेस्ट व्हिडिओ पहा, ओटीपी शोधा आणि बनून जा पुढील 'लकी विनर'!
रील तुम्ही येथे पाहू शकता.
1. गिफ्ट बद्दल ची रील तुम्ही येथे पाहू शकता
2. Phaltandiary.com ला फॉलो करा.





